*कणकवली /-

मे महिन्याच्या ४ तारिक पासून सिंधुदुर्गात कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी कनेडी येथे केली. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतीच जिल्हा नियोजनमधून कृषी प्रदर्शन भरविण्याची मागणी केली होती. कोरोनानंतर शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी साधनांची ओळख व्हावी या उद्देशाने जिल्हा नियोजन मधून आदर्शवत कृषी प्रदर्शन आयोजित करा, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओना दिल्या. कृषी प्रदर्शन आयोजनामध्ये माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे मार्गदर्शन सहकार्य घ्यावे, असेही पालकमंत्री सामंत सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. सीईओ प्रजीत नायर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, संजय पडते, सुशांत नाईक, बाळा भिसे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे, हर्षद गावडे, नीलम पालव, प्रदीप नारकर, महिंद्र सावंत, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page