You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील कुसूर येथे सापडला मानवी सांगाडा.;सदर सांगाडा सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या कुसूर गावातील इसमाचा असल्याचा पोलिसांकडून अंदाज.

वैभववाडी तालुक्यातील कुसूर येथे सापडला मानवी सांगाडा.;सदर सांगाडा सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या कुसूर गावातील इसमाचा असल्याचा पोलिसांकडून अंदाज.

वैभववाडी /-

वैभववाडी कुसूर पिंपळवाडी फळसाची खांद येथे मानवी सांगाडा आढळून आला आहे. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. घटनास्थळी सापडलेल्या कपड्यावरुन तो सांगाडा सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या कुसूर गावातील इसमाचा असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कुसूर पिंपळवाडी येथील प्रकाश गंगाराम कुळये रा.कुसूर पिंपळवाडी यांची पळसाची खांद येथे काजूची बाग आहे. रविवारी सकाळी ते बागेत जात असताना त्यांना जंगली भागात मानवी कवटी व दोन हाडे दिसली. त्यांनी याबाबत वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली. वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हाडां शेजारी एक निळ्या रंगाची बॕटरी, काळसह जीर्ण झालेला टी शर्ट, चाॕकलेटी रंगाचा जीर्ण झालेला बर्मुडा सापडला आहे. यावेळी पंचनामा करत असताना सापडलेल्या बॕटरी व कपड्यावरुन सदर मानवी कवटी व हाडे ही सहा महिण्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सखाराम गोपाळ नामये वय ७५ रा.कुसूर पिंपळवाडी यांचा असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सखाराम नामये हे दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ६ वा.पासून घरातून नापत्ता झाले होते. याबाबत त्यांचा मुलगा शरद सखाराम नामये यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली होती. त्यांना दारु पिण्याची सवय होती. सदर नापत्ता व्यक्तीचीच ही कवटी व हाडे असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार सुनिल पडेलकर करीत आहेत.

अभिप्राय द्या..