खारेपाटण /-
*कणकवली राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागून संबंधित गाड्या येत असताना, एका गाडीने ब्रेक मारला असता,ताफ्यातील पोलिसांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.