You are currently viewing खासकीलवाडा येथे गळफास लावून वृद्धाची आत्महत्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज

खासकीलवाडा येथे गळफास लावून वृद्धाची आत्महत्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील खासकीलवाडा भागात राहणाऱ्या आत्माराम जयराम दळवी (वय ७८) यांचा मृतदेह परिसरात असलेल्या काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले असा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खासकीलवाडा महापुरुष मंदिर परिसरात सकाळी मॉर्निंगवॉकसाठी जाणाऱ्या लोकांना दळवी यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी धाव घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबतची खबर सुनील दळवी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याची माहिती ठाणे अंमलदार अल्मेडा यांनी दळवी हे सावंतवाडी एसटी आगारात मॅकेनिक म्हणून कामाला होते. ते काही दिवसांपूर्वी निवृत्त झालेत.

अभिप्राय द्या..