मालवण /-

मालवण शहरातील मॅकेनिकल परिसर भंडारी हायस्कुल रोड वरील कांदळकर चाळीतील अक्षय सुधीर कांदळकर या २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असून मालवण पोलिसांनी याची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे. आज सकाळी मालवण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भंडारी हायस्कुल रोडवरील कांदळकर चाळीत राहणारा अक्षय कांदळकर हा आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत पेट्रोल पंप व बाजारात फिरताना काही जणांना दिसला. मात्र पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घरातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत अक्षय याचा मृतदेह सापडून आला. खोलीतील फॅनसाठी असलेल्या हुकाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेला दिसून आला. यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी गणेश कुडाळकर, बाबी जोगी, जितू मेस्त्री, राजन वराडकर, सागर धव यांनी व इतरांनी पोलिसांना सहकार्य केले. अक्षय कांदळकर हा शांत व सुस्वभावी म्हणून परिचित होता. अलीकडेच तो गाड़ी ड्रायविंगचे काम करत होता. त्याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page