You are currently viewing पाणी मागण्यांच्या बहाण्याने घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.;नराधमाला स्थानिक ग्रामस्थांनी दिला चोप.;सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

पाणी मागण्यांच्या बहाण्याने घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.;नराधमाला स्थानिक ग्रामस्थांनी दिला चोप.;सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

सावंतवाडी /-

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात घडला आहे. संबंधित घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी त्या ठीकाणी धाव घेत संशयिताला बेदम चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. या बाबतची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. संबंधित संशयित हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. याप्रकरणी संशयिता विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत महिला तपासी अधिकारी नसल्यामुळे त्या ठिकाणी कणकवलीतील तपासी अधिकारी आणून हा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती घरात एकटीच होती. यावेळी पाणी मागण्याच्या बहाण्याने संशयिताने घरात प्रवेश केला. व तिच्या सोबत अश्लील वर्तन केले. यावेळी तिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले. व संशयिताला यथेच्छ चोप दिला. त्यानंतर नातेवाइकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची माहिती दिली.त्यानुसार पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा