You are currently viewing वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झलेल्या तलाठ्याला जामीन मंजूर..

वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झलेल्या तलाठ्याला जामीन मंजूर..

ओरोस /-

वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मालवण तालुक्यातील वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाले यांना विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी आज ३० हजार रुपयांचा जमीन मंजूर केला आहे. तलाठी कंठाले यांच्यावतीने वकील संग्राम देसाई, अविनाश परब व सुहास साटम यांनी काम पाहिले.

वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी मालवण तालुक्यातील वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाले याने वाळू व्यावसायिकाला कॉल करून लाच मागितली होती. या बाबतची तक्रार वाळू व्यवसायिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाले यांना सोमवारी २१ रोजी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता कंठाले यांना लाच मागितल्या प्रकरणी विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज न्यायाधीश रोटे यांनी त्यांना ३० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा