You are currently viewing पणदूर :पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख मान्यवर कुमार केतकर यांचा सन्मान करताना मान्यवर

पणदूर :पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख मान्यवर कुमार केतकर यांचा सन्मान करताना मान्यवर

जिज्ञासा कुतूहलअसेल तरच तुम्ही भविष्याचा घेवू शकाल- कुमार केतकर.


कुडाळ /-


भरपूर वाचनातच ज्ञान आहे. मोबाईल चा वापर आवश्यक तेवढाच करा मोबाईल मुळे तुमचा जीवनातील वेळ वाया जात आहे. सध्याचे युग हे विज्ञानाचे आहे. शिक्षणाचा मुख्य हेतू म्हणजे जिज्ञासा.जिज्ञासा कुतूहलअसेल तरच तुम्ही भविष्याचा घेवू शकाल. हे वाचनामुळे शक्य होते असे सांगुन फक्त पदवीधर होऊ नका तर स्पर्धात्मक टिकायचे असेल चौफेर ज्ञान मिळवा.असे प्रतिपादन कुमार केतकर यांनी पणदूर तिठा विद्यालयात बोलताना केले.
दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीच्या पद्मश्री बाबासाहेब महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ नुकतेच संस्थेच्या अँड. रामकृष्ण रंगमंचावर संपन्न झाले.
पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा वार्षिक स्नेहसंमेलन बक्षिस वितरण समारंभाच्यावेळी अध्यक्षस्थानी श्री. केतकर हे उपस्थित होते. यावेळी सौ. शारदा केतकर , बांधकाम व्यावसायिक भाईसाहेब मंत्री, उद्योजक दादासाहेब परुळकर, दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे कार्याध्यक्ष शशिकांत अणावकर , उपाध्यक्ष श्री. जैतापकर, प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन वासकर, आपा गावडे, अकादमी सचिव डॉ. अरूण गोडकर, प्रा. उमा सावंत, शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एम.जी. कर्पे , महाविद्यालय विद्यार्थी परिषदचा जनरल सेक्रेटरी सौरभ अणावकर, कुमार साहिल सावंत, जीवन मिशन चे श्री. गावडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी श्री. केतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, अलीकडच्या काळातील विश्व म्हणजे मोबाईल, या काळातही महाविद्यालयातील सुसज्ज वाचनालय टिकून हे पाहून आनंद झाला असे उद्गार खासदार, साहित्यिक व पत्रकार कुमार केतकर यांनी या बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात व्यक्त केले.यावेळी भाईसाहेब जीवन विद्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयीन स्तरावरील मिळविलेल्या सांघिक तसेच वैयक्तिक विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, द्विप प्रज्वलनाने झाली. दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे कार्याध्यक्ष मान. अणावकर यांनी केतकर यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. कुमार केतकर यांनी आपल्या खासदार निधीतून सांस्कृतिक हॉल साठी रु.१५ लाख रू. निधी यापुर्वीच दिला आहे.

महाविद्यालयाच्या ‘आरंभ २०२० २०२१’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरूण गोडकर,सुत्रसंचालन अविनाश वालावलकर अहवाल वाचन प्रभारी प्राचार्य सचिन वासकर तर आभार प्राध्यापक धोंडू गावडे यांनी मानले.

अभिप्राय द्या..