वेंगुर्ला /-

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार असून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.वेंगुर्ले येथे मागासवर्गीयांसाठी
आयोजित करण्यात आलेले जिल्ह्यामध्ये हे पहिले नारळमित्र प्रशिक्षण आहे.या नारळमित्र प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्याचा उपयोग इतर शेतकऱ्यांसाठी व समाजासाठी करा व आपली आर्थिक उन्नती साधा,असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी तथा कृषीभूषण एम..के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.नारळ विकास बोर्ड, राज्य केंद्र ठाणे व महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या संस्था येथे मागासवर्गीयांसाठी नारळमित्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आयोजित उदघाटन कार्यक्रमात एम.के.गावडे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब,नारळ बोर्डचे प्रक्षेत्र अधिकारी शरद आगलावे,नारळमित्र प्रशिक्षक रुपेश तांबडे,काथ्या उद्योजिका श्रुती रेडकर आदी उपस्थित होते.या शिबिराचे उदघाटन प्रज्ञा परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी एम.के.गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना एम.के.गावडे म्हणाले की,कोकणाच्या आर्थिक उन्नतीसाठी नारळपीक हे महत्वाचे आहे.नारळक्षेत्र वाढले तर आर्थिक उन्नती होऊ शकते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची प्रशिक्षणे दिली तर रोजगार निर्मिती होऊ शकते.त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्या,असेही ते म्हणाले.यावेळी मार्गदर्शन करताना नारळ बोर्डचे प्रक्षेत्र अधिकारी शरद आगलावे म्हणाले की,नारळ विकास बोर्ड कडून विविध अनुदान मिळते,इन्शुरन्स,नर्सरी व विविध योजना उपलब्ध आहेत.विविध प्रक्रिया उद्योगांचे ट्रेनिंग प्रोजेक्टस आहेत.यासाठी अशा नारळमित्र प्रशिक्षणाचा लाभ घ्या.नारळाखालील क्षेत्र वाढविणे गरजेचे असून गाव, तालुका,जिल्हा पातळीपर्यंत उत्पादकता वाढविली पाहिजे,असेही ते म्हणाले.मागासवर्गीयांसाठी हे नारळमित्र प्रशिक्षण ६ दिवस चालणार आहे,अशी माहिती प्रज्ञा परब यांनी दिली.प्रज्ञा परब यांनी स्वागत केले व श्रुती रेडकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page