वेंगुर्ला /-

साटेली पंचक्रोशीतील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.साटेली मध्ये अद्ययावत काथ्या प्रकल्प उभा करणार,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक एम.के. गावडे यांनी साटेली,ता. सावंतवाडी येथे केले.वेंगुर्ले महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था व सावंतवाडी क्वायर क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला क्वायर योजनेअंतर्गत साटेली येथे दीर्घकालीन काथ्या प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी एम. के. गावडे बोलत होते.यावेळी  व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते पपू जाधव,महिला काथ्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब,नंदकिशोर झारापकर,नम्रता झारापकर, साटेली सरपंच मनश्री जाधव,
सावंतवाडी कॉयर क्लस्टरच्या चीफ एक्झिक्युटिव्ह श्रुती रेडकर, साधना करंगुटकर, मिलन साटेलकर, अनुश्री साटेलकर, रेणुका साटेलकर, साक्षी कोरगावकर,भावना मांजरेकर, अमिता पालव,काथ्या प्रशिक्षक निखार्गे आदींसह महिला बचतगट संघ महिला ,महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होत्या.यावेळी एम.के. गावडे यांचा महिला बचत गट संघातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना एम.के.गावडे म्हणाले की,साटेली पंचक्रोशीत भरपूर नारळाची लागवड आहे. सातार्डा नदीच्या पलीकडे गोवा बॉर्डर असून त्या भागातही भरपूर नारळ शेती आहे. गोव्यामध्ये सोडणावर प्रक्रिया करणारे नारळ उद्योग नाहीत. काथ्या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. या परिसरातील महिला रोजगार – स्वयंरोजगारासाठी खूपच इच्छुक आहेत महाराष्ट्र शासन उद्योग विभागातर्फे कॉयर साठी नेहमीच सहकार्य मिळते. आत्ताच महाराष्ट्र शासनाने कॉयर पॉलिसी जाहीर केलेली आहे. सावंतवाडी तालुक्यात काथ्या उद्योग व्हावेत, यासाठी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले इच्छुक आहेत. त्यांनी काही दिवसापूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. सावंतवाडी कॉयर क्लस्टर मार्फत येथील महिलांना काथ्याचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे यावेळी एम.के. गावडे म्हणाले.काथ्या उद्योगाच्या प्रणेत्या प्रज्ञा परब म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षात संपूर्ण जिल्ह्यात कित्येक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. मालवणमध्ये अद्ययावत क्लस्टर सुरू झाले आहे.येथील महिलांच्या रोजगारासाठी महिला काथ्या औद्योगिक संस्था सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. महिलांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊन या उद्योग समूहात सामील व्हावे.तसेच काही महिलांना वैयक्तिक स्वरूपासाठी उद्योगासाठी सहकार्य केले जाईल.काथ्यापासून दोरी, दोरीपासून पायपुसणी व अनेक विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी प्रशिक्षक म्हणून निखार्गे या काम पाहत आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नम्रता झारापकर यांनी व साक्षी कोरगावकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page