You are currently viewing आंनदव्हाळ येथे डंपर- दुचाकीत अपघात कर्नाटक येथील दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी..

आंनदव्हाळ येथे डंपर- दुचाकीत अपघात कर्नाटक येथील दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी..

मालवण /-

मालवण कसाल मार्गावर आनंदव्हाळ येथील सर्विसींग सेंटर जवळच्या वळणावर बुधवारी सकाळी मालवणवरुन येणारा डंपर आणि मालवणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीमध्ये भिषण अपघात झाला या अपघातात दुचाकिवरील कर्नाटक येथील दोघे युवकांना गंभीर जखमी झाले असून त्याना तत्काळ अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

बुधवारी सकाळी आनंदव्हाळ येथील सर्विसींग सेंटर येथे मालवणवरुन चौके येथे चिरेवहातूक करणाऱ्या डंपर (MH-07 AJ 0515-) आणि मालवणच्या दिशेने जाणाऱ्या हिरो पाँशन (KA 23 EX 0030 ) या दुचाकीमध्ये भिषण अपघात झाला या अपघातात कामानिमित्त मालवणला येणाऱ्या दुचाकीवरील कर्नाटक चिकोडी येथील ओंकार येडूरे आणि विनायक येडूरे हे युवक गंभीर जखमी झाले. अपघातात एकाच्या पायाला तर दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली जखमीना स्थानिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक तपास मालवण पोलिस ठाणे चे पो.काँ. सुभाष शिवगण,पो, काँ. जानकर, करत आहेत

अभिप्राय द्या..