कुडाळ /-

बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत सिंधूकन्या उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील अंगणवाडीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रथम कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांचे आणि कन्येचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना वृक्ष व भेटवस्तू प्रदान करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील अंगणवाडीमध्ये बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत सिंधू कन्या उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समई प्रज्वलनाने झाला. यावेळी स्थानिक नगरसेवक व भाजपा गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, अंगणवाडी सेविका मानसी पाटकर, आशा स्वयंसेविका सोनाली कुडाळकर, अंगणवाडी मदतनीस इंदिरा मेस्त्री तसेच लाभार्थी रियांशी चेतन बोबडे, रूष्दां वाडकर, यश्वी जाधव, आथिफा रेहानी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर या मातांसह मुलींचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना पोफळीचे वृक्ष व इतर भेटवस्तू देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page