You are currently viewing सावंतवाडीत भाजप पुरस्कृत महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम सौ.रितिका हावळ ठरल्या पैठणीच्या मानकरी.

सावंतवाडीत भाजप पुरस्कृत महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम सौ.रितिका हावळ ठरल्या पैठणीच्या मानकरी.

सावंतवाडी /-

सावंतवाडी भाजपा महिला मोर्चाच्यावतीने, महिला दिनाचं औचित्य साधून, खास महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सावंतवाडीत सर्वप्रथम मोठ्या दिमाखात पार पडला. यामध्ये सावंतवाडीतील शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. सौ. रितिका हावळ या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर सौ. मनाली आरवारी, सौ. पुजा बिंद्रे द्वितीय, तृतीय क्रमांकासह आकर्षक साडीच्या मानकरी ठरल्या.

आज साऱ्या घराची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर उचलणाऱ्या महिलांना सुद्धा एक विरंगुळा निर्माण व्हावा तसेच त्यांच्यातील कला-गुणांना वाव भेटावा या उद्देशाने “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाच आयोजन मोहिनी मडगावकर यांच्या संकल्पनेतून  करण्यात आले होते. सावंतवाडीचे भावोजी हेमंत मराठे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विविध गेम्स घेण्यात आले. या कार्यक्रमामार्फत शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. या गेम्समधून विजेत्या ठरलेल्या सौ. रितिका हावळ पहिल्या क्रमांकासह खास पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर द्वितीय सौ. मनाली आरवारी, तृतीय पुजा बिद्रे आकर्षक साडीच्या मानकरी ठरल्या. त्याचबरोबर अनेक खेळ आणि बक्षिसेही सहभागी महिलांनी जिंकल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करत असताना महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर म्हणाल्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यात अधिक प्रयत्न करणार असून केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी मेहनत घेणार आहे. महिलांनी देखील यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत यशस्वी उद्योजिका बनाव अस आवाहन त्यांनी केले. उपस्थित मान्यवर महिलांनी देखील मार्गदर्शन केले.

 यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विर्नोडकर, उद्योजिका रेखा कुमठेकर, रात्रीस खेळ चाले फेम प्रतिभा चव्हाण, मेघना राऊळ, नंदी प्लास्टिकच्या शारदा गुरव , गौरी परब, दैवज्ञ महिला मंडळच्या भारती मठकर, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, बचत गट अध्यक्ष अस्मिता भराडी , योगा स्टंटमध्ये भरारी मारणाऱ्या भूमी पटेकर, सरचिटणीस मेघना साळगावकर, उपाध्यक्ष ज्योती मुद्राळे, चिटणीस अदिती दळवी,
अस्मिता परब, साक्षी गवस, राधिका चितारी, प्राजक्ता मुद्राळे, वंदना मडगावकर, सिद्धी आरिवडेकर यांसह भाजप महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..