You are currently viewing डाक सेवक कर्मचाऱ्यांच्या विविध मांगण्यासाठी ग्रामीण डाक सेवक युनियनचे १६ मार्च  ला देशव्याप आंदोलन.

डाक सेवक कर्मचाऱ्यांच्या विविध मांगण्यासाठी ग्रामीण डाक सेवक युनियनचे १६ मार्च ला देशव्याप आंदोलन.

सिंधुदुर्गनगरी /-

डाक सेवक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, डाक सेवेचे खाजगीकरण थांबावे, कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन ने बुधवार १६  मार्च २०२२ रोजी देशव्यापी धरणे आंदोलनची साद दिली असून संघटनेच्या आदेशानुसार अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग च्यावतीने १६ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी अधीक्षक डाकघर येथे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव कॉ. तुकाराम गावडे यांनी दिली.
कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, जिडीएस सहित सर्व कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी, सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे, डाक सेवेचे खाजगीकरण थांबावे, ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समावून घेत सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, १८० दिवसांची पगारी रजा मंजूर करण्यात यावी, निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्ती दिवशीच देण्यात यावे, वैद्यकीय सुविधा द्यावी, विवाहित मुलांना अनुकंपा नियुक्ती आदेश लागू करावेत आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन ने बुधवार दि. १६ मार्च २०२२ रोजी देशव्यापी धरणे आंदोलनची साद दिली असून संघटनेच्या आदेशानुसार अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग च्यावतीने १६ मार्च रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत सिंधुदुर्गनगरी अधीक्षक डाकघर येथे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव कॉ. तुकाराम गावडे यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा