You are currently viewing महिलांनी स्वयंरोजगार करून सर्व क्षेत्रात पुढे याव.;समिक्षा दाभाडे.

महिलांनी स्वयंरोजगार करून सर्व क्षेत्रात पुढे याव.;समिक्षा दाभाडे.


वेंगुर्ला / –

महिलांनी बचतगटाच्या मार्फत स्वयंरोजगार करून सर्व क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन समिक्षा दाभाडे यांनी वेंगुर्ले येथे जागतिक महिला दिनी केले.त्यासाठी सर्वतोपरी लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ले नगरपरिषद वेंगुर्ले दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत हिरकणी शहरस्तर संघ आयोजित महिला दिनानिमित्त बचत गटाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मधुसूदन कालेलकर नाट्यगृह वेंगुर्ले कॅम्प या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी समीक्षा दाभाडे, कीर्ती सोंडगे,योगिता लोकरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण केल्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी समीक्षा दाभाडे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांच्या हस्ते तिन्ही मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.सदरचा कार्यक्रम वेंगुर्ले मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, प्रकल्प अधिकारी विलास ठुम्बरे, समूह संघटक अतुल अडसूळ, स्वाती मांजरेकर, मनाली परब, हिरकणी अध्यक्ष मेघा पडते आदींनी योग्यरित्या आयोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी व सर्व बचत गटाच्या एकूण ६५० महिला उपस्थित होत्या. 

अभिप्राय द्या..