मालवण /-

जिल्ह्यात आम.नाईक कोट्यावधींचा निधी आणला असे सांगतात तर दुसरीकडे विधानसभेत निधीची भांडण करतात तरीही जिल्ह्याच्या विकासा साठी निधी आणू शकत नाहीत ही वस्तुस्थिती मनसेने नेहमी मांडली तसेच याची पोलखोलही मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली.याही वेळेला जिल्हयासाठी भरीव आर्थिक तरतूद होणार नसल्याचा अंदाज आल्याने अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी आमदार सिंधुदुर्गात पळाले.त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला आम.नाईक यांना वेळ नाही अशी टिका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

विधिमंडळाच्या सभागृहात दरवर्षी मार्च मध्ये अर्थसंकल्प अधिवेशन होत असते.एप्रिल-मार्च या कालावधीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी लागणाऱ्या निधीची तरतुद केली जाते.आमदारांना वाचण्यासाठी प्रत दिली जाते. त्यावर विधानसभा व विधानपरिषदेत चर्चा होऊन राज्यपालांच्या स्वाक्षरीने अंतिम मंजुरी दिली जाते.निधीची तरतुद झाल्याने प्रलंबित विषय मार्गी लागतात.परंतु जनतेच्या विषयाशी देणे-घेणे नाही अशा अविर्भावात कुडाळचे आमदार वैभव नाईक अर्थसंकल्प सोडून जिल्ह्यात पळाले.

पर्ससिन विषयावरुनही शिवसैनिकांत नाराजीचा सुर आहे स्वत:च्या स्वार्थासाठी अन्य पक्षातुन सेनेत प्रवेश देत त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहेत. नाराज मंडळीना थोपवण्याची घाई आमदार करत आहेत.आमदारांवर अनेक निष्ठावान शिवसैनिक नाराज आहे.नाराज मंडळीची थोपवा-थोपवी शनीवार,रविवारी दोन दिवस सुट्टीच्या दिवशी करता आली असती पण तसे न करता अर्थसंकल्प भाषणाकडे पाठ फिरवून सिंधुदुर्गात आम.नाईकांना पळावे लागते यावरुन जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांवर किती कार्यक्षम आहेत हे स्पष्ट होत असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page