You are currently viewing कुडाळ पंचायत समिती सभापती नुतन आईर यांनी प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांना येणा-या अडचणीबाबत वेधले प्रकल्प अधिकाऱ्यांचे लक्ष !

कुडाळ पंचायत समिती सभापती नुतन आईर यांनी प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांना येणा-या अडचणीबाबत वेधले प्रकल्प अधिकाऱ्यांचे लक्ष !

सिंधुदुर्गनगरी /-

कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नुतन आईर यांनी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक,अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रधानमंत्री आवास घरकुल लाभार्थी यांना येणा-या जागेबाबतच्या अडचणीबाबत आज निवेदन देत मागणी केली आहे.प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच अन्य शासकीय योजनेतून घरकूल मंजूरीसाठी लाभार्थींना स्वतःच्या नावावर जमिन असणे किंवा बक्षीसपत्राने जमिन घेणे आवश्यक आहे.परंतु आपल्या या जिल्हयातील ग्रामीण भागांमध्ये काही कुटुंबे भूमिहीन आहेत.परंतु त्यांची पूर्वापार असणारी कच्ची घरे त्यांचे नावावर आहेत.तरी सदर घरपत्रक उता-पाच्या आधारे ग्रामपंचायतीचा दाखला घेऊन त्यांना त्याच ठिकाणी घरकूल मंजुर करणेत यावे.

तसेच काही लाभार्थीच्या 7/12 वरती अनेक सहहिस्सेदार असल्यास त्यामधील काही सहहिस्सेदार हे बाहेर गावी स्थायीक झालेले असतात तर काही कौटुंबिक वादातून संमती देत नाहीत. तरी अशा लाभार्थीचे नाव 7/12 मध्ये समाविष्ठ असेल तर त्या लाभार्थ्याचे हमीपत्र घेऊन त्यांना घरकुल मंजूर करणेत यावे.तसेच काही बेघर लाभार्थी हे भूमिहीन असून काहींना बक्षीसपत्र करुन घेणे शक्य नाही आहे. तरी त्यांना संमतीपत्राच्या आधारे घरकूल मंजूर करणेत यावे. तरी वरीलप्रमाणे योजना राबविताना येणा-या अडचणी दूर करुन अशा लाभार्थींना घरकूल मंजूर होण्याच्या व त्यांचे निवासाची सोय होणेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही व्हावी यासंदर्भातील मागणी कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नुतन आईर ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा