You are currently viewing आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी मालवण, कुडाळ, कणकवलीतुन सुटणार बसेस.;भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन…

आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी मालवण, कुडाळ, कणकवलीतुन सुटणार बसेस.;भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन…

मालवण /-

आंगणेवाडीतील भराडी मातेच्या उद्या होणाऱ्या वार्षिकोत्सवासाठी मालवण, कुडाळ व कणकवली येथून काही बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून या फेऱ्या सुरू होणार असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

भराडी मातेचा वार्षिकोत्सव उद्या होत आहे. ग्रामीण भागातून भाविक या उत्सवात सहभागी होऊन देवीच्या दर्शनासाठी जातात. मात्र यावर्षी एसटीचा संप न मिटल्याने जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे एसटी प्रशासनाने भाविकांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी एसटी बसफेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात आगारातून सकाळी सात वाजल्यापासून तीन बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. कुडाळ येथून तीन तर कणकवली येथून चार बसफेऱ्या दिवसभर सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर रेल्वेस्थानक येथूनही बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा