You are currently viewing गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त.;वाहतुकीवर एक्साईजची कारवाई.

गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त.;वाहतुकीवर एक्साईजची कारवाई.

बांदा /-

गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ दारुच्या बाटल्या पकडण्यात आल्या. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०७ क्यू १७००) असा एकूण ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी सुनील एकनाथ गावडे (३३, रा. वागदे कणकवली) या तरुणावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर हुमरठ येथे करण्यात आली.

डिसेंबर नंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीसांकडून दारु कारवाया करणे जवळपास बंदच होते. त्यामुळे बेकायदा दारु वाहतुकीला सध्या ऊत आला आहे. जवळपास दीड महिन्यांनंतर एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. सदर कारवाई पथकात निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, योगेश शेलार यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी करीत आहेत.

अभिप्राय द्या..