दोडामार्ग /-
दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी करून पक्षविरोधी कुरघोड्या केल्याबद्दल दोडामार्ग तालुक्याची भाजपा पक्ष कार्यकारिणी आजपासून बरखास्त केल्याची धक्कादायक कारवाई भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. नवीन कार्यकारिणीत ज्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केले त्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. नूतन कार्यकारिणी निवड होईपर्यंत भाजपाचे प्रमोद कामत आणि महेश सारंग हे दोडामार्ग प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हा बँक ते नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यानी पक्षविरोधी काम केल्याचा फटका भाजपला बसला. याबाबत लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती तेली यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार आज पत्रकार परिषदेत तेली यांनी दोडामार्ग तालुका भाजपा कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती तेली यांनी दिली. जिल्हा बँक निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबाबद्दल आज दोघांना बडतर्फीची कारवाई का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचेही तेली म्हणाले.