You are currently viewing कासार्डे येथे रक्तदान शिबिर संपन्न २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कासार्डे येथे रक्तदान शिबिर संपन्न २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कणकवली /-

कासार्डे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल चव्हाण यांच्या मातोश्री श्रीम. सुवर्णा नारायण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ रोजी अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे – कणकवली येथे आयोजित केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पत्नी आणि त्यांचे सुपुत्र अभिषेक प्रमोद जठार यांच्या हस्ते झाले.

प्रथमच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मीना रहाटे ,सुनिल नारकर, दिनेश चव्हाण, उमेश चव्हाण,तुषार जाधव, संतोष जाधव, शरद देवरुखकर, अमेय मढव आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी जिल्हा ओरोस रक्तपेढीचे अधिकारी किशोर नांदगावकर आणि स्टाफ यांचे सहकार्य लाभले.

अभिप्राय द्या..