You are currently viewing ओरोस रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

ओरोस रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

ओरोस/-

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ अध्यक्ष सौ .दिपा ताटे यांच्या पुढाकाराने ओरोस येथे रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या कोरोनाची परिस्थिती सामान्य होत असली तरीही मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे . या करीता मानव सेवेच्या दुष्टीकोनातून अध्यक्ष दिपा ताटे, सचिव तन्वी सावंत,जिल्हा अध्यक्ष जोतिका हरयान, सदस्य. नेहा परब,सुप्रिया वालावलकर, माधवी यादव, दिप्ती चव्हाण, रश्मी गावडे, दिपा चव्हाण, मनिषा त्रिभुवणे, लिनाक्षी कदम, रुपाली वरक, स्वामिनी नाईक यांनी पुढाकार घेत शासकीय रुग्णालय सिधुदुर्ग यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी (9421267292) या नंबर वर संपर्क साधा.

अभिप्राय द्या..