You are currently viewing ..अखेर आमदार नितेश राणे यांची झाली जामिनावर मुक्तता..

..अखेर आमदार नितेश राणे यांची झाली जामिनावर मुक्तता..

सावंतवाडी /-

संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांची गुरुवारी सर्शत जामिनावर मुक्तता झाली. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातून सावंतवाडी येथील कारागृहात आणल्यानंतर जामिनाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर राणे कारागृहातून बाहेर पडले. यावेळी कार्यकत्या=नी फटाके फोडून जल्लोष केला. राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला करताना शिवसेना नेत्यांवरही टीका केली. मी आता व्यवस्थीत तब्येतीची तपासणी केल्यानंतर बरा होईन. त्यानंतर बोलेन तेव्हा यांचा बीपी वाढायला सुरुवात होईल, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेत्यांना हाणला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मला चार दिवसाचा अवधी होता. मात्र न्यायालयाबाहेर पोलिसांनी जी भुमिका घेतली, त्यामुळे कार्यकत्या=ना त्रास होऊ नये यासाठी मी सरेंडर होण्याचा निर्णय घेतला. मला सरकार अटक करु शकले नाही, असेही ते म्हणाले.

अभिप्राय द्या..