You are currently viewing मालवण शहरातील “तो” खड्डा नगरपालिका प्रशासनाने बुजविला…

मालवण शहरातील “तो” खड्डा नगरपालिका प्रशासनाने बुजविला…

मालवण /-

मालवण फोवकांडा पिंपळपार समोर मालवण नगरपालिकेच्या रस्त्याला भलेमोठे खिंडार पडल्याने नागरिकांनी नगर पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती.गेली अनेक दिवस पडलेल्या या खड्याबाबत पालिकेकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने आज नगरसेवक गणेश कुशे यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर सायंकाळी हा खड्डा बुजविण्यात आला.मालवण फोवकांडा पिंपळपारच्या समोरच्या रस्त्याच्या मध्यभागी भलेमोठे खिंडार पडले होते. हे खिंडार वाहनचालकांना धोकादायक बनले होते. आज येथील रिक्षाव्यवसाईकानी आणि नागरीकांनी नगरसेवक गणेश कुशे माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांचे लक्ष वेधले असता त्यांनीही नगर पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. गणेश कुशे यांनी तात्काळ नगरपालिकेच्या बांधकाम विभागाजवळ तक्कार केली. याची दखल घेत हा रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला.

अभिप्राय द्या..