पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत कुडाळ नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी कार्यक्रम.

कुडाळ /-

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधुन वाहणाऱ्या वहाळावर वनराई बंधारा बांधण्यात आला. पाणी अडवा पाणी जिरवा या अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील युवकांनी हा बंधारा बांधला त्यामुळे या बंधाऱ्यामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि याचा फायदा नगरामध्ये असलेल्या विहिरीसह अन्य भागातील विहिरींना होणार आहे.

वनराई बंधाऱ्याच्यावेळी या प्रभागाचे नगरसेवक विलास कुडाळकर, स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर, श्री. विजय आजगावकर, श्री. संजय हेरेकर, तात्या शिरसाट, मुकादम दिलीप कदम, श्री. प्रसाद नाईक, श्री. संकेत गावडे, रोहित परब, विनायक मांजरेकर, विलास मुणगेकर, वामन राणे, सतिश जाधव, यशवंत कुडाळकर तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील लक्ष्मण कुडाळकर, नितेश कुडाळकर, ओंकार कदम, प्रथमेश कुडाळकर, राजहंस जाधव, गोविंद जाधव, सुरज कुडाळकर, सुजय जाधव, किरण कुडाळकर, निखिल मालवणकर, साईनाथ कुडाळकर आदी उपस्थित होते.

फोटो:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील वहाळावर बांधण्यात आलेला वनराई बंधारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page