You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हा कार्यालय वेंगुर्ले येथे सुरु…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हा कार्यालय वेंगुर्ले येथे सुरु…

वेंगुर्ले /

श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ आज ४ फेब्रुवारीला जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते स्वामीप्रसाद कॉम्प्लेक्स हॉस्पिटल नाका वेंगुर्ले येथे करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्यासह जिल्हा भंडारी महासंघाचे सचिव विकास वैद्य, महासंघाचे सदस्य उत्तम मोबारकर वगैरे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व भंडारी बांधवांना एकत्रित करून समाज बांधवांना आरोग्य विषयक सेवा, वधू – वर सूचक मेळावा, तसेच अन्य समाजपयोगी उपक्रम घेण्याचा मानस यावेळी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..