सावंतवाडी /-
सावंतवाडी येथील सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रमोद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सदानंद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष उमाकांत वारंग व उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पणदुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान सोसायटीला चांगले दिवस येण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. ग्राहकांना चांगली सेवा मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला…
