You are currently viewing जेष्ठ नागरिक संघाकडून संजू परब यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार.

जेष्ठ नागरिक संघाकडून संजू परब यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार.

सावंतवाडी /-

72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सातोसे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते. यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब देखील या कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते संजू परब यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातोसे सरपंच बबन सातोसकर, सातोसे जेष्ठ नागरीक संघ अध्यक्ष पेडणेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..