कुडाळ/

कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे रवळनाथ पटांगणावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशाल परब मित्रमंडळ व नवचैतन्य मित्रमंडळ वाडोस यांच्या वतीने विशाल परब पुरस्कृत एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विशाल परब यांनी बोलताना खेळाडूंनी आणि तरून मुलांनी कोणत्याही व्यासाच्या आहारी जाऊ नका खेळातून आपलं व आपल्या गावाचं जिल्हाचं नाव उज्ज्वल करा शुन्यातून विश्व निर्माण करता मी गावासाठी सदैव आपल्या पाठीशी आहे मी केलेला स्लाॅटरहाऊसचा संकल्प लवकरच पुर्ण करेन आणि गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करेन असे सांगितले.यावेळी वाडोस सरपंच संजना म्हाडगुत, उपसरपंच संजय देसाई, उपतालुकाध्यक्ष राजा धुरी, विभाग प्रमुख दिनेश शिंदे, बाबल म्हाडगुत, चिराग खोचरे,सत्यवान म्हाडगुत, संदीप म्हाडगुत, मानकरी आनंद परब, आदी ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page