You are currently viewing दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांचे राजीनामे नामंजूर,राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यानी दिलेली लढत कौतुकास्पद.;अर्चना घारे-परब.

दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांचे राजीनामे नामंजूर,राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यानी दिलेली लढत कौतुकास्पद.;अर्चना घारे-परब.

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे देत असल्याची घोषणा केली. खरंतर समोर दिल्लीश्वरांचे सधन परतीस्पर्धी होते. त्यांच्या कडे मुबलक साधनसामग्री आणि दारूगोळा ठासून भरलेला होता. त्याच्यासमोर आमच्या मावळ्यांनी निकराने लढा दिला. साधनसामग्री नसताना, दारूगोळा नसताना आमचे मावळे भिडले. जिद्दीने लढले. काही जागांवर तर केवळ नशिबाने पडले. त्यांनी दिलेला हा लढा खरोखरच कौतुकास्पद आहे. खरं तर त्याचं कौतुक व्हायला हवं. आमचा कार्यकर्ता स्वाभिमानी आहे. त्याने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याची घोषणा केली.मी दोडामार्गातील पदाधिकाऱ्यांशी आणि आमच्या वरिष्ठांशी बोलले.जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी देखील बोलले आहे, दोडामार्ग पदाधिकार्‍यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत. उलट त्यांनी दिलेल्या या लढ्याबद्दल त्यांचं पक्षातर्फे कौतुक केले जाईल आणि पुढील निवडणुकांमध्ये त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल.

अभिप्राय द्या..