जयवंत परब यांच्या रूपाने झुंजार नेत्यास मुकलो! भाई गोवेकर

जयवंत परब यांच्या रूपाने झुंजार नेत्यास मुकलो! भाई गोवेकर

मसुरे /-

राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जयवंत परब यांचे कार्य प्रेरणादायी होते. मुंबईत जाऊन अनेक लोक मोठे होतात पण गावच्या लोकांबद्दल परब साहेब यांच्या सारख्या फार कमी जणांना आस्था असते. जयवंत परब यांच्या रूपाने मुंबईतील हक्काचा आधार आपण गमावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्वदच्या दशकात शिवसेना वाढविण्यात परब साहेब यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने आपण सर्व जण एका झुंजार नेत्यास मुकलो असल्याचे प्रतिपादन शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी येथे केले.

मसुरे गावचे सुपुत्र व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचे नुकतेच निधन झाल्याने मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयवंत परब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. सर्वसामान्य परिस्थितीतून मुंबई येथे जाऊन स्वकर्तुत्वाने जयवंत परब यांनी नावलौकिक मिळविला. त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा यापुढेही सर्वांच्या स्मरणात राहील. असे यावेळी माजी जी. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले. जि प सदस्य सौ सरोज परब म्हणाल्या, परब साहेब यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबा बरोबरच गावाची व समाजाची सुद्धा कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. स्वतःच्या आजारपणात सुद्धा इतरांची काळजी करणाऱ्या परब साहेब यांच्या निधनाने आपण एका कुटुंब प्रमुखास मुकलो आहोत अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी सरपंच संदीप हडकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी पं स. सदस्य महेश बागवे, डॉ. सुधीर मेहेंदळे,विठ्ठल लाकम,मुख्याध्यापिका सौ शुभांगी लोकरे- खोत, तातू भोगले यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी उपसरपंच राजेश गावकर, डॉक्टर अनिरुद्ध मेहेंदळे, एस एल परब, सचिन पाटकर, शिवाजी परब, राजा कोरगावकर, छोटू ठाकूर, सुहास पेडणेकर, अशोक बागवे, उदय बागवे, जगदीश चव्हाण, अजय प्रभुगावकर, विलास मेस्त्री, अनिल मेस्त्री, संतोष पेंडुरकर, बाळू दळवी, राजू सावंत,बापू मसुरेकर, तात्या हिंडळेकर, संतोष सावंत, शशीकांत परब, नागेश सावंत, पुरुषोत्तम शिंगरे, कृष्णा पाटील, संजय मोरे यांच्या सह भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन पंढरी मसुरकर यांनी केले.

अभिप्राय द्या..