You are currently viewing वायगणी येथील बंद असणारे हॉस्पिटल पुनर्जीवित करण्यासाठी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचा पुढाकार

वायगणी येथील बंद असणारे हॉस्पिटल पुनर्जीवित करण्यासाठी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचा पुढाकार

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे बंद स्थितीमध्ये असणारे लक्ष्मीनारायण हॉस्पिटल सुरु करण्यासाठी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर , यांनी पुढाकार घेतला असून .बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, , नर्सिंग महाविद्यालय, अदिती पै यांचे दि.बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन,फिजिओथेरेपी महाविद्यालयाच्या मदतीने या परिसरातील लोकांना रुग्णसेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी त्यांनी वायंगणी येथे जाऊन प्रत्यक्ष त्या हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली .यावेळी त्यांच्यासोबत अण्णा ठाकूर, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, दीपक नाईक, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरज शुक्ला, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रथमेश हरमलकर ,इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा