You are currently viewing सिंधूदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे निलेश राणे यांच्याकडून अभिनंदन.

सिंधूदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे निलेश राणे यांच्याकडून अभिनंदन.


सिंधूदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे भाजप प्रदेश सरचिटणीस माजी खा.निलेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले . जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय ओरोस येथे त्यांनी गुरूवारी भेट दिली व उपस्थित नवनिर्वाचित सर्व संचालकांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

यावेळी माजी आमदार प्रमोद जठार ,नवनिर्वाचित बँक संचालक विठ्ठल देसाई, श्रीम.प्रद्ण्या ढवण, गजानन गावडे, समिर सावंत, रविंद्र मडगांवकर ,बाबा उर्फ संदिप परब,भाजपा पदाधिकारी आनंद शिरवलकर आदि मान्यवर उपस्थित होते.

माजी खा.निलेश राणे यांनी यावेळी सर्व संचालकांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तर सिंधुदुर्ग जिल्हा बँक कामकाजा बाबत माहीती घेतली. जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी,ठेवीदार यांच्या साठी चांगलं काम करा.बँकेचं नांव उज्वल होईल यासाठी प्रयत्न करा या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात, देशात या बँकेच्या यशाचा ठसा उमटवला जाईल असे काम तुम्ही कराल असा विश्वास निलेश राणे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..