You are currently viewing वेंगुर्ले येथे २३ जानेवारी ला चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्ले येथे २३ जानेवारी ला चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्ला /-


हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचं एक चालत बोलत विद्यापीठ. शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारण करत जागतिक स्तरावर बाळासाहेबांनी आपल्या सडेतोड वक्तृत्वाने आपला ठाकरी बाणा जपला. दरवर्षी २३ जानेवारीला स्व.बाळासाहेबांची जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम सर्वत्र राबवले जातात.वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने २३ जानेवारी २०२२ रोजी साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे सकाळी ९ वा. वक्तृत्व (खुला व शालेय गट) आणि चित्रकला(खुला गट) स्पर्धेचे तर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खुल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे’ हा विषय असून यासाठी सादरीकरण चा वेळ किमान ८ मिनिटे ते कमाल १० मिनिटे असा असून प्रथम , द्वितीय, तृतीय ,उत्तेजनार्थ प्रथम व उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकसाठी अनुक्रमे रुपये १५००, १०००, ७००, २५०, २५० व प्रत्येकी चषक असे पारितोषिकाचे स्वरूप असून वक्तृत्व शालेय गटासाठी(इ.१०च्या आतील) ‘बहुजननायक छ.शिवाजी महाराज’ असा विषय असून सादरीकरण कालावधी किमान ५ मिनिटे ते कमाल ७ मिनिटे वेळ आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकसाठी अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५००, २५०, २५० व प्रत्येकी चषक असे पारितोषिक स्वरूप आहे.खुल्या चित्रकला स्पर्धेसाठी ‘कोरोना योद्धे’ हा विषय असून जलरंगाचा वापर करणे अनिवार्य असून स्पर्धकांना कागद दिला जाईल यासाठी प्रथम, व्दितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम,उत्तेजनार्थ द्वितीय साठी अनुक्रमे रुपये १०००,७००, ५००, २५०, २५० व प्रत्येकी चषक अशी पारितोषिक असून स्पर्धेच्या नावनोंदणी आणि स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंजुषा आरोलकर व पंकज शिरसाट (९६७३५६३२२३) यांच्याशी संपर्क साधावा आणि सायंकाळी ४ ते ६ दरम्यान तालुक्यातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम चे आयोजन साई मंगल कार्यालय,वेंगुर्ला येथे केले असुन त्याचा लाभ जास्तीत महिलांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब व शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..