You are currently viewing कु.अक्षय फाटक या विद्यार्थ्यास उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे तर्फे श्रद्धांजली..

कु.अक्षय फाटक या विद्यार्थ्यास उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे तर्फे श्रद्धांजली..

कुडाळ /-


उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चा चतुर्थ वर्षात शिकणारा विद्यार्थी कु.अक्षय फाटक याचे कॅन्सर या दुर्धर आजारामुळे नुकतेच निधन झाले. गेले सहा महिने मुंबई येथील हिंदुजा व नानावटी इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरू होते परंतु दि.१७ जानेवारी २०२२ रोजी त्याची प्राणज्योत मालवली. मालवण तालुक्यातील कट्टा नजीक ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी खूपच होतकरू होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण महाविद्यालय परिवार शोकाकुल झाला होता. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर,सर्व प्राध्यापक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी वर्ग या सर्वांनी मिळून कु.अक्षय फाटक याला मनोभावे श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी सर्वानाच अश्रू अनावर झाले. कु.अक्षय फाटक च्या आत्म्यास शांती लाभावी व त्याच्या कुटुंबियांना या दुखास सामोरे जाण्याची ताकद मिळुदे अशी प्रार्थना या प्रसंगी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा