You are currently viewing दुचाकी अपघातात सावंतवाडी पंचायत समिती सभापती जखमी..

दुचाकी अपघातात सावंतवाडी पंचायत समिती सभापती जखमी..

सावंतवाडी /-

सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती निकिता सावंत यांच्या गाडीला डींगणे येथे अपघात झाला असून, या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने हा अपघात घडला. हा अपघात डींगणे ग्रामपंचायत समोर घडला आहे. यावेळी स्थानिकांनी त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..