You are currently viewing भाजपा दिंव्यांग आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार

भाजपा दिंव्यांग आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार भाजपा दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला .
आज जिल्हा बॅंक मध्ये भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन जिल्हा बॅंकेने दिव्यांगासाठी कमी व्याजदराच्या योजना आणुन दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी भाजपा दिंव्यांग आघाडीच्या वतीने करण्यात आली .
यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक समीर सावंत , भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते .
भाजपा दिंव्यांग आघाडीच्या शिष्टमंडळात जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , सावंतवाडी तालुका संयोजक संजय बाबुराव देसाई , जनसंपर्क प्रभारी सदानंद पावले , क्रीडा प्रभारी संजय पवार , सदस्य – गणेश देवळी , योगेश धुरी , रविंद्रनाथ चव्हाण इत्यादी उपस्थित होते .

अभिप्राय द्या..