You are currently viewing आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना,राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीच्या बुथवर दिली भेट.;नगरपंचायत निवडणूक मतदान शांतपणे.

आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना,राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीच्या बुथवर दिली भेट.;नगरपंचायत निवडणूक मतदान शांतपणे.

कुडाळ/-

कुडाळ नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ४ जागांसाठी आज मतदान होत असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी, एमआयडीसी, केळबाईवाडी, लक्ष्मीवाडी या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आघाडीकडून किरण शिंदे, अमित राणे,प्रांजल कुडाळकर, अश्विनी पाटील हे चार उमेदवार रिंगणात असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले आहे.

यावेळी भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव,शहरप्रमुख संतोष शिरसाट,विकास कुडाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अतुल बंगे, मिलिंद नाईक, भूषण परुळेकर, कृष्णा धुरी,संजय भोगटे,सचिन काळप, राजू कविटकर,रामा धुरी,स्नेहा दळवी, श्रेया गवंडे, श्रेया परब, रुपेश पावसकर, सुशील चिंदरकर,नितीन सावंत, दीपक आंगणे, योगेश धुरी, स्वप्नील शिंदे, चेतन पडते,कुष्णा तेली, बाळा राऊळ, जीवन बांदेकर, गुरु सडवेलकर, गुरु गडकर,भूषण कुडाळकर, सत्यवान कांबळी, सतीश कुडाळकर आदींसह आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा