You are currently viewing कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा..

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा..

कणकवली /-

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहास कक्षाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे.कनिष्ठ विभागासाठी माझा आवडता समाज सुधारक, जाणता राजा छत्रपती शिवराय व भारत माझा देश आहे, हे विषय असून वरीष्ठ गटांसाठी मला समजलेले समाज सुधारक, जाणता राजा छत्रपती शिवराय व भारत-काल आज व उद्या, असे विषय ठेवण्यात आले आहेत. वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुवाच्च अक्षरात निबंध लिहून पाठवायचे आहेत. पहिल्या तीन विजेत्यांना ग्रंथ स्वरुपात भेट आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ७०० शब्द व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १००० शब्दात निबंध लिहून दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ पर्यंत महाविद्यालयाच्या शिफारशीसह प्रा. प्रियांका विनायक पाटील, इतिहास विभाग, कणकवली कॉलेज, कणकवली ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, पिन- ४१६६०२ या पत्त्यावर पाठवून द्यावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, इतिहास विभागप्रमुख डॉ. सोमनाथ कदम प्रा. डाॅ. मारोती चव्हाण, प्रा. प्रियंका पाटील यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..