You are currently viewing वेंगुर्ले भाजपाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन –

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन –

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला भाजपा च्या वतीने भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिने घडवला राजा रयतेचा रचली स्वराज्याची गाथा , दैवत असे ती राजमाता जिजाऊ , तसेच उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येया पर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबु नका असे संदेश देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद अशी विश्वात वेगळी ओळख असणाऱ्या या दोन महान व्यक्तींना जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर ,माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , माजी नगरसेविका श्रेया मयेकर , माजी नगरसेवक प्रशांत आपटे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट, महिला मोर्चा च्या रसीका मठकर, आकांक्षा परब, केशव ठाकुर आदी उपस्थित होते .

अभिप्राय द्या..