You are currently viewing मठ टाकयेवाडी येथील रक्तदानशिबिरास ७१ रक्तदात्यानी सहभाग घेत रक्तदान केले..

मठ टाकयेवाडी येथील रक्तदानशिबिरास ७१ रक्तदात्यानी सहभाग घेत रक्तदान केले..

वेंगुर्ला /-

मठ टाकयेवाडी येथील अष्टपैलू क्रिकेट खेळाडू कै. गितेश गोपाळ गावडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अजित नाईक मित्र परिवार, संत लालाजी भक्त मंडळ आणि मठ गावातील सर्व क्रिकेट खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने संत लालाजी मंदिर – टाकयेवाडी  मठ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यानी सहभाग घेऊन रक्तदान करुन कै.गितेश गावडे ला श्रद्धांजली वाहिली.हे या शिबिराचे १२ वे वर्ष आहे. या शिबिराचे उदघाटन मठ सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाले.यावेळी  भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुका अध्यक्ष  सुहास गवंडळकर, संत लालाजी भक्त मंडळी,ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी परब, वैद्यकिय अधिकारी डॉ.कोल्हे,अधीपरीचरिका प्रांजली परब, किशोर नांदगावकर, नितीन गावकर,परिचर उल्हास राणे, सुरेश डोंगरे, रंजन कडुलकर, सनी रेडकर,बबन परब,प्रसाद सावंत,बाळू भगत,शंभू परब, गौरव गावडे,गोपाळ गावडे,सचिन आईर,उत्तम सतपाळ, शिवा सावंत,काशिनाथ सावंत, ताता घाटकर,दादा घाटकर ,प्रकाश परब,सुदेश राणे,बाबू राणे,श्याम घाटकर, आरोग्य सेविका प्राजक्ता धुरी, डॉ. कु.राखी कुडतरकर,पत्रकार के.जी.गावडे,सुनील गावडे,रवींद्र खानोलकर,संजय बागायतकर,महेश धुरी,सीधेश कोकरे,रघुवीर बावलेकर,दादा बावलेकर,विनायक जोशी,प्रमोद गावडे,आनंद सावंत,पपू सावंत, अजित नाईक मित्र परिवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र खानोलकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा