You are currently viewing आवळेगाव, कडावल, निरुखे, पांग्रड गावांमधील विविध विकास कामांची झाली भूमिपूजने..

आवळेगाव, कडावल, निरुखे, पांग्रड गावांमधील विविध विकास कामांची झाली भूमिपूजने..

आ. वैभव नाईक व जि.प.गटनेते नागेंद्र परब यांची प्रमुख उपस्थिती..

कुडाळ /-

वेताळबांबर्डे जिल्हा परिषद विभागातील आवळेगाव, कडावल, निरुखे, पांग्रड या गावांमधील विविध विकास कामांची भूमिपूजने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व जि.प.गटनेते नागेंद्र परब यांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये आवळेगाव फौजदारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, त्याचबरोबर कडावल येथील रवळनाथ मंदिर येथे स्वच्छता गृहाचे भूमिपूजन, कडावल येथे हायमास्टचे लोकार्पण, कडावल तावडेवाडी येथे मोरीची दुरुस्ती, निरूखे ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण करणे, निरूखे तेरसेवाडी पायवाट बांधणे,पांग्रड येथील रेडेतळवाडी रस्ता, किनवणेवाडी रस्ता, महादेव मंदिर परिसर येथे पूल बांधणी व नागामाचे टेंब सत्पुरुष येथे सभामंडप बांधणे, या कामांची भूमिपूजने करण्यात आली. ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक व शिवसेनेचे आभार मानले. याप्रसंगी आवळेगाव येथे उपसभापती जयभारत पालव, तालुका संघटक बबन बोभाटे, विभागप्रमुख पप्पू पालव, संदीप सावंत, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत,नरेंद्र राणे, सुनील सावंत, दिनेश परब, लालू सावंत, विवेक कुपेरकर, स्वप्नाली साळगावकर, नंदू मेस्त्री, संतोष घोगळे. कडावल येथे विलास गुरव, संजय देवळी, बाळकृष्ण ठाकूर,सरपंच स्नेहा ठाकूर, ग्रा.प.सदस्य आनंद तेरसे, भिकाजी गुरव, विद्याधर मुंज,शीला गुरव, गुरुनाथ मुंज, अमित कल्याणकर, जगू सावंत. निरुखे येथे सरपंच मंजिरी करंदीकर, उपसरपंच तुकाराम निरुखेकर, ग्रा. प. सदस्य सुहानी मेस्त्री, अक्षया नाईक, अनिल करंदीकर, मंगेश मर्गज, मुकेश पालव, सोमा तेरसे, सत्यवान नाईक, विष्णू नाईक, बाळकृष्ण तेरसे. पांग्रड येथे आर.टी.मर्गज,मंगेश मर्गज, दादू मर्गज, दाजी मर्गज,अनु मर्गज,आनंद मर्गज,पी.टी.मर्गज, सुमन मर्गज,प्रवीण मर्गज, रामदास मेस्त्री, सुभाष मर्गज,राजाराम मर्गज आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..