You are currently viewing कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतरणचा निर्णय होणार आज..

कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतरणचा निर्णय होणार आज..

कणकवली /-

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण बाबतचा अंतिम निर्णय आज 10 जानेवारी रोजी घेणार असल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली येथे सकल मराठा समाज शिष्टमंडळाला कणकवलीत दिला. तसेच केवळ कणकवली नव्हे तर जिल्ह्याला मानबिंदू ठरेल असे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व सुशोभीकरण सह स्मारक यासाठी 1 कोटींचा निधी तरतूद डीपीडिसी मधून करणार असल्याचेही पालकमंत्री सामंत म्हणाले.

कणकवली पं. स. कार्यालयानजीक नजीक हायवे च्या सर्व्हिस रोड वर असलेल्या शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण चे घोंगडे मागील 3 वर्षे भिजत पडले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये 2 महिन्यांपूर्वी कणकवली नगरपंचायत मध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी दिले होते. मात्र अद्याप निर्णय न झाल्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सकल मराठा समाज शिष्टमंडळाने पालकमंत्री उदय सामंत याना कणकवलीत शिवाजी महाराज पुटळ्याजवळ भेट देण्याची मग्नज केली होती.त्यानुसार आज रात्री 8 वाजता पालकमंत्री सामंत यांनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकल मराठा समाज मंडळ शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी केलेल्या चर्चेत पुतळा स्थलांतरण बाबत उद्याच 10 जानेवारी रोजी अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शासकीय जागेत केवळ कणकवली लाच नव्हे तर जिल्ह्याचा मानबिंदू ठरेल असे स्मारक बनविण्यासाठी 1 कोटी च्या निधीची तरतूद डीपीडिसी मध्ये करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

यावेळी भाई परब, महेश सावंत, सुशांत नाईक, ऍड. हर्षद गावडे, सुशील सावंत, महेश सांब्रेकर, सुशांत दळवी, शेखर राणे, भास्कर राणे, बबलू सावंत, राजू राठोड ,बाळू मेस्त्री, बच्चू प्रभूगावकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..