You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे एन.सी.सी. शिबीरांची सुरुवात..

सिंधुदुर्गनगरी येथे एन.सी.सी. शिबीरांची सुरुवात..

ओरस /

५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरस, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील एन.सी.सी. कॅडेट्ससाठी वार्षिक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प दि. ०८ जानेवारी २०२१ ते १२ जानेवारी २०२१ या दरम्यान क्रीडा संकुल ओरस येथे आयोजित करण्यात आलेला असून या कॅम्पसाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील फोंडाघाट, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, बांदा, तळेरे, रत्नागिरी, चाफे, देवरुख, महाविद्यालयामधील एन.सी.सी. १७४ कॅडेटसनी आपला सहभाग नोंदविला आहे. सदर कॅम्प मधून कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासासाठी ड्रिल, नेतृत्वगुण कौशल्य, शारिरीक तंदरुस्ती, सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम, हत्यार प्रशिक्षण, आपत्कालीन व्यवस्थापन इ. कला गुणांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. सदरचा कॅम्प यशस्वी करण्यासाठी ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस.सी.के. लेखराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार पांडा, ट्रेनींग जे.सी.ओ इंद्रकेश, बी. एच. एम. सुरजित सिंग, सुभेदार तुकाराम, सुभेदार सतनाम सिंग सहित ५ जे.सी.ओ, १० एन.सी.ओ, आणि इतर ऑफिस स्टाफ कार्यरत आहेत. या कॅम्पसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीचे सहयोगी एन.सी.सी ऑफिसर्स लेफ्टनंट डॉ. स्वामीनाथ भट्टर, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे सहयोगी एन.सी.सी ऑफिसर्स लेफ्टनंट डॉ. ताडेराव डी. बी. तसेच कणकवली महाविद्यालयाच्या सी.टी.ओ. जयश्री कसालकर यांची कॅम्प ऑफिसर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..