You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत ९ व १० जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर..

पालकमंत्री उदय सामंत ९ व १० जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर..

सिंधुदुर्गनगरी /-

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या रविवार ९ जानेवारी व सोमवार १० जानेवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार ९ जानेवारीला सायं. ६ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी बैठक. सायं. ७ वा. ओरोस सिंधुदुर्ग येथे राखीव. सोमवार १० जानेवारीला सकाळी ११ वा. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात जिल्हा नियोजन समिती सभा, दुपारी १ वा. जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासकामांबाबत आढावा बैठक, दुपारी १.३० वा. जिल्हा परिषदेकडून निःसमर्थ व्यक्तींसाठी राखीव ५ टक्के निधीचे नियंत्रण करणेकरिता गठित जिल्हास्तरीय समितीची सभा, दुपारी १.४५ वा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अभियान समितीची बैठक, दुपारी २ वा. ओरोस सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

अभिप्राय द्या..