You are currently viewing एसटी दगडफेक प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल..

एसटी दगडफेक प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल..

कणकवली /-

तालुक्यातील कळसुली गावात एसटी च्या चालक केबिनच्या काचेवर दगडफेक करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चालक कुमार निवृत्ती तांबट यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आज सकाळी सव्वा आठ च्या सुमारास कणकवली हुन काळसुली येथे जाऊन परत कणकवली च्या दिशेने येणाऱ्या एसटी वर अज्ञाताने दगडफेक करून काच फोडली होती. याबाबत चालक कुमार तांबट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात भा.दं. वि.336, 427, सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 1984 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक घाडीगांवकर करत आहेत.

अभिप्राय द्या..