You are currently viewing दाभोली येथे आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न

दाभोली येथे आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न

वेंगुर्ला /-

       तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोली येथील श्रीकांत चेंदवणकर यांच्या पटांगणात आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ.ए. वाय. मुंज, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, कृषी पर्यवेक्षक विजय घोंगे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोलम,जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्ग कृषी सहाय्यक प्रसाद खडपकर, शेतकरी गुरुनाथ कांबळी, ग्रामपंचायत सदस्य बांदवलकर, विष्णू दाभोलकर, कृषी सेवक सुरज परब,खानोली कृषी सहाय्यक लाडू जाधव, तंत्र सहाय्यक ममता तुळसकर, कृषी सेवक आर.एम.गव्हाणे, स्नेहल रगजी, सुयोग ठाकर आदी उपस्थित होते.या प्रशिक्षणास वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. ए. वाय. मुंज यांनी आंबा व काजू पिकावरील येणाऱ्या प्रमुख किड व रोग यांची ओळख तसेच त्यांचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड यांनी कृषी विभागामार्फत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.या आंबा व काजू मोहर संरक्षण प्रशिक्षणास दाभोली येथील शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक विजय घोंगे यांनी व सूत्रसंचालन व आभार लाडू जाधव यांनी मानले.

अभिप्राय द्या..