You are currently viewing जि. प. शाळा खानोली नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक

जि. प. शाळा खानोली नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक

वेंगुर्ला /-


जिल्हा परिषद शाळा खानोली नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक घेण्यात आले.
सौ.जाई सुनील नाईक,तळेकरवाडी,सौ. स्वप्नीला तोरसकर, कणकवली, श्री. राजेश घोलेकर,आवेरे या शिक्षण प्रेमींनी शाळेतील तीन मुलांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे ९००० रुपये शाळे जवळ जमा केले. सामजिक बांधिलकी जपत या दात्यांनी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा शासनास देऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपक्रमास आपले योगदान दिले.जि.प.शाळा खानोली नाईकवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील नाईक यांनी सदर चे देणगीदार मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून इष्ट, मित्र, नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून नाईक यांनी हे देणगीदार मिळविले.शाळेचे मुख्याध्यापक स्वामी सावंत यांनी देणगीदार व देणगी देण्यास प्रवृत्त करणारे यांचे आभार मानले. या देणगीदारांचा येत्या प्रजासत्तादिनी विशेष सन्मान
करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..