You are currently viewing भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी व मंडल अध्यक्ष यांची बैठक संपन्न..

भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी व मंडल अध्यक्ष यांची बैठक संपन्न..

सिंधुदुर्ग /-

भा.ज.पा.किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी व मंडल अध्यक्ष यांची बैठक जिल्हा कार्यालय -कणकवली येथे नुकतीच संपन्न झाली.या बैठकीसाठी कि.मो. जिल्हा अध्यक्ष श्री.उमेश सावंत
जिल्हा सरचिटणीस तथा किसान मोर्चा प्रभारी श्री.प्रसन्ना देसाई, कणकवली मंडल अध्यक्ष श्री.संतोष कानडे, कि.मो.माजी जिल्हा अध्यक्ष श्री.अमृत चौगुले आणि भा.ज्.पा नेते व् जिल्हा बँक संचालक श्री.अतुल काळसेकर व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्री.अतुल काळसेकर यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष श्री.उमेश सावंत यांनी केला.तसेच भात पीक स्पर्धेमध्ये कोकण विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या वैभववाडी कि.मो.मंडल अध्यक्ष श्री.महेश संसारे यांचा सत्कार श्री.अतुल काळसेकर यांच्या हस्ते किसान मोर्चा तर्फे करण्यात आला.श्री.अशोक शिरवडकर,श्री.रामकृष्ण सावंत ( खानोली – वेंगुर्ले ) ,श्री.ज्ञानेश्वर् केळंजी (मातोंड – वेंगुर्ले ) ,श्री.हरी केळुसकर ( मालवण )यांना किसान मोर्चा जेष्ठ सल्लागार म्हणून श्री.अतुल काळसेकर् यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
या बैठकीत करुळ घाट वाहतुकीला योग्य नसल्याने ऊस वाहतूक बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातले ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.यासाठी बांधकामं विभागाला निवेदन देऊन त्वरित उपाय योजना करावी, अन्यथा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे बैठकी मध्ये ठरविण्यात आले.तसेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२२ – किसान पेंशन योजना गावा गावात राबविण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले .तसेच भविष्यात जिल्हा बॅंक व शेतकरी यांच्या मध्ये दुव्याचे काम किसान मोर्चाने करावे असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले. बैठकीसाठी कि.मो.जिल्हा सरचिटणीस श्री.गुरुनाथ पाटील.श्री.राजेश माळवदे,चिटणीस श्री.अजय सावंत,कणकवली मंडल अध्यक्ष श्री.अनिल पेडणेकर,श्री नंदू सावंत व् जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन कीसान मोर्चा जि.सरचिटणीस राजेश माळवदे यांनी केले .

अभिप्राय द्या..