You are currently viewing कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक,चालकाला किरकोळ दुखापत..

कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक,चालकाला किरकोळ दुखापत..

कणकवली /-

कणकवलीहून कळसुलीकडे जाणाऱ्या एसटी बसवर कळसुली डोंगरी येथे अज्ञाताने दगडफेक केली. सदर घटनेत चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.कणकवलीहून कळसुलीकडे निघालेल्या या बसवर सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास कळसुली डोंगरी येथे ही दगडफेक झाली. यावेळी सुमारे 30 विद्यार्थी बस मध्ये होते. सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. मात्र दगड बस चालकाच्या हाताला लागल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. एसटीचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते.

अभिप्राय द्या..